महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट ब)

परीक्षेचा आराखडा
• एकूण गुण ४००
अनुक्रमांक पेपर क्रमांक विषय प्रश्न संख्या गुण दर्जा माध्यम परीक्षा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
पेपर १ मराठी ५० १०० बारावी मराठी १ तास वस्तुनिष्ट बहुपर्यायी
इंग्रजी ५० १०० पदवी इंग्रजी
पेपर २ सामान्य अध्ययन आणि बुद्धिमापन चाचणी १०० २०0 पदवी मराठी आणि इंग्रजी १ तास वस्तुनिष्ट बहुपर्यायी
परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धती लागू
पेपर १ चा अभ्यासक्रम
एकूण गुण २००
अनुक्रमांक विषय विषयांतर्गत घटक
मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
इंग्लिश Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage
पेपर २ --
एकूण गुण २००
अनुक्रमांक विषय विषयांतर्गत घटक
सामान्य बुद्धिमापन व आकलन उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
चालू घडामोडी अंकगणित आणि सांख्यिकी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.
माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार अधिनियम २००५ (अद्ययावत) व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.
भारतीय संघ राज्यव्यवस्था व संविधान भारतीय राज्यघटना, घटना निर्मिती, प्रस्तावनेची भूमिका व तत्वे, महत्वाची कलमे/वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे (शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड), स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ (अधिकार व कार्ये), राज्य विधीमंडळ (विधानसभा, विधानपरिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, कर्तव्ये व विधी समित्या) इ.
इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास (१८८५-१९४७) सामाजिक व आर्थिक जागृती, महत्वाच्या व्यक्ती व समाजसुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी
भूगोल व पर्यावरणः भूगोलः भारत व महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूपे, राजकीय व प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती (वने व खनिजे), मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या (स्थानांतर व त्याचे परिणाम), ग्रामीण वस्त्या, तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.

पर्यावरणः मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण (विशेषतः वनसंधारण), प्रदूषण व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनातील राज्य/राष्ट्रीय/जागतिक पातळीवरील संघटना व संस्था.
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany).
दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, Aerial and drone photography, GIS and its application).
माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology).
9 अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र समग्रलक्षी अर्थशास्त्रः वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल.
भारतीय अर्थव्यवस्थाः आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
शारीरिक चाचणी आणि मुलाखत
केवळ पोलिस उपनिरीक्षक पदाकरिता